
















उन्नती हा हिंदी शब्द आहे जो समृद्धी दर्शवतो. उन्नती सोशल फाऊंडेशन दि.२४ मे २०१८ साली त्यांनी स्थापन झाले. हि ना-नफा संस्था आहे. उन्नती फाऊंडेशन द्वारे अनेकविध सामाजिक उपक्रम यांच्यासह, डॉ.कुंदाताई संजय भिसे यांच्या तर्फे २५०० स्क्वेअर फुट जागा, विविध समाज उपयोगी उपक्रम जसे की, डान्स क्लब, झुंबा क्लासेस, चित्रकला क्लासेस यांना मोफत पुरविण्यात येते. उन्नती फाऊंडेशन द्वारे विविध कार्यक्रम राबविले जातात जसे - उन्न 'ती ' चा गणेशोत्सव, तिरंगा सन्मान रॅली, नवरात्रोत्सव, वृक्षारोपण, दिवाळी पहाट, रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबीर, विविध सरकारी योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि बरेच उपक्रम वेगवेगळ्या निमित्ताने साजरे केले जातात. उन्नती सोशल फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, समाजकल्याण, महिला आणि युवा सक्षमीकरण या क्षेत्रात काम करते. उन्नती सोशल फाऊंडेशन चे संस्थापक श्री. संजय तात्याबा भिसे आणि अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे आहेत.
"नई सोच प्रगती की और" या ब्रीदवाक्यासह , २०१८ साली उन्नती सोशल फाऊंडेशनची मुहूर्तमेढ श्री.संजय तात्याबा भिसे यांनी रोवली. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.कुंदाताई भिसे यांच्या अध्यक्षतेखाली उन्नती सोशल फाऊंडेशन समाजाच्या प्रत्येक क्षेत्राला सामावून घेत धडाडीने कार्यरत आहे. उन्नती सोशल फाऊंडेशच्या स्थापने पासून ते आत्तापर्यंत च्या विविध क्षेत्रातील कार्याचा विस्तृत आढावा घेणारी चित्रफीत 🎥
सामाजिक भान अग्रस्थानी ठेवून आपण समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून २४ मे २०१८ साली आपल्या सहकाऱ्यां समवेत उन्नती सोशल फाऊंडेशनची स्थापना केली.
फाऊंडेशनचे द्वारे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविले जातात.
उन्नती सोशल फाउंडेशन या संस्थेने सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, कला व संस्कृती अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा विस्तृत विस्तार केलेला आहे.
संस्थेच्या स्थापनेपासूनच पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रामध्ये उन्नती सोशल फाउंडेशन अत्यंत प्रभावी कार्य करत आहे.
या सर्व बहुआयामी उपक्रमांचा समावेश असलेला एक संक्षिप्त आढावा आपण या चित्रफीतीच्या माध्यमातून पाहणार आहोत.
वनांचा मानवी जिवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. उन्नती सोशल फाउंडेशन देखील वृक्ष संवर्धनासाठी कटिबद्ध असून, दरवर्षी १ जानेवारी ला नागरिकांना रोप वाटप करण्यात येते.
अधिक जाणून घ्या

कुंदा भिसे यांच्या यशाचा अविभाज्य घटक नागरिकांचे समर्थन; असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले

प्रेरणादायी महिलांना ‘उन्नती महिला रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला

उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली

नेत्र तपासणी शिबिरात 500 जणांनी सहभाग घेतला

जरवरी सोसायटी, पी.के. इंटरनॅशनल स्कूल समोर,
पिंपळे सौदागर,
पुणे, महाराष्ट्र, भारत
+91 91460 87777
info@unnatisocialfoundation.org

